ला हंटा (कॉलोराडो)
Appearance
ला हंटा हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील छोटे शहर आहे. ओटेरो काउंटीचे प्रशासकीय केन्द्र असलेल्या या शहराची लोकसंख्या २०२० च्या जनगणनेनुसार ७,३२२ होती.[१]
आर्कान्सा नदीच्या काठावर वसलेले हे शहर सांता फे पायवाट आणि पेब्लोला जाणाऱ्या प्राचील रस्त्याच्या तिठ्यावर असल्याने याला ला हंटा (स्पॅनिशमध्ये तिठा) हे नाव दिले गेले.[२][३] बेंट्स फोर्ट हा जुना गढीवजा किल्ला येथून जवळ आहे.
शिकागो ते लॉस एंजेलस दरम्यान धावणारी साउथवेस्ट चीफ ही रेल्वेगाडी ला हंटाला थांबते.
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "Find a County". National Association of Counties. 2011-06-07 रोजी पाहिले.
- ^ Gannett, Henry (1905). The Origin of Certain Place Names in the United States. Government Printing Office. pp. 179.
- ^ Dawson, John Frank (1954). Place names in Colorado: why 700 communities were so named, 150 of Spanish or Indian origin. Denver, CO: The J. Frank Dawson Publishing Co. p. 30.