उदयपूर
उदयपूर | |
भारतामधील शहर | |
सिटी पॅलेस व शहराचे दृष्य |
|
देश | भारत |
राज्य | राजस्थान |
जिल्हा | उदयपूर जिल्हा |
स्थापना वर्ष | इ.स. १५५९ |
क्षेत्रफळ | ६४ चौ. किमी (२५ चौ. मैल) |
समुद्रसपाटीपासुन उंची | २,००० फूट (६१० मी) |
लोकसंख्या (२०११) | |
- शहर | ५,९८,,६८५ |
- घनता | २४२ /चौ. किमी (६३० /चौ. मैल) |
- महानगर | १०,६४,२२२ |
प्रमाणवेळ | भारतीय प्रमाणवेळ |
उदयपूर हे भारत देशाच्या राजस्थान राज्यामधील उदयपूर जिल्ह्याचे मुख्यालय व एक ऐतिहासिक शहर आहे. सरोवरांचे शहर ह्या टोपणनावाने प्रसिद्ध असलेले उदयपूर राजस्थानच्या मेवाड प्रांताच्या राजधानीचे शहर होते. उदयपूरची स्थापना महाराणा दुसरे उदय सिंह ह्यांनी १५५९ साली केली व मेवाडची राजधानी चित्तोडगढहून उदयपूरला हलवली. १८१८ पर्यंत मेवाडची राजधानी राहिलेले उदयपूर ब्रिटिश राजवटीमध्ये राजपुताना एजन्सीचा भाग होते. उदयपूर जयपूरच्या ४०३ किमी नैऋत्येस तर अहमदाबादच्या २५० किमी ईशान्येस स्थित आहे.
उदयपूर हे राजस्थानमधील एक अत्यंत लोकप्रिय पर्यटनस्थळ असून पर्यटनावर येथील अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. येथील पिछोला सरोवरावर बांधण्यात आलेले सिटी पॅलेस, सरोवरातील अनेक कृत्रीम बेटे (लेक पॅलेस) इत्यादींसाठी येथे जगभरातून पर्यटक येतात.
मुंबई व दिल्लीदरम्यान धावणारा राष्ट्रीय महामार्ग ८ उदयपूरमधूनच जातो. उदयपूर विमानतळ शहराच्या २२ किमी पूर्वेस स्थित आहे. उदयपूर सिटी रेल्वे स्थानक येथील प्रमुख रेल्वे स्थानक असून येथून दिल्ली, कोलकाता, मुंबई इत्यादी प्रमुख शहरांसाठी थेट गाड्या सुटतात.
प्रेक्षणीय स्थळे
[संपादन]१) सिटी पॅलेस - उदयपूरच्या राजघराण्याचा पिचोला तलावाशेजारी असणारा राजवाडा. या राजवाड्यात अनेक शैलीमध्ये झालेले बांधकाम आहे. उदयपूरच्या गादीवरील अनेक राजांनी आपापल्या काळात काही बांधकाम केले त्यामुळे विविध शैलीमध्ये झालेले बांधकाम इथे दिसते. मोर चौक (काचेचा वापर करून बनवलेले मोर ), पाळणा महाल (राजघराण्यातील वापरले गेलेले सुरेख पाळणे), जनाना महाल, वस्तू संग्रहालय अशी काही उल्लेखनीय दालने या महालात आहेत. माणशी तिकीट साधारण २५० रुपये. मार्गदर्शकाची सोय (अधिक शुल्क भरून ).
२) जुन्या मोटारगाड्यांचा संग्रह - जयपूरच्या सत्ताधीशांनी वापरलेल्या जुन्या गाड्यांचा संग्रह पाहण्यासारखा आहे. तिकीट २५० रुपये. हा संग्रह उदयपूर शहरात वेगळ्या ठिकाणी आहे (राजवाड्याचा भाग नव्हे).
३) सहेलीयोन्की बाडी - महाराजा संग्रामसिंह यांनी १७१० ते १७३४ या कालावधीत आपल्या राणीसाठी आणि तिच्या माहेरून आलेल्या ४८ मैत्रिणीसाठी या बागेची निर्मिती केली. विविध प्रकारचे कारंजे उदा. आवाजावर चालणारे कारंजे, श्रावणातील कोसळत्या पावसाप्रमाणे आवाज करणारे कारंजे इथे दिसतात. अतिशय शांत आणि रमणीय ठिकाण.
४) राणा प्रताप ज्युबिली बाग - राणा प्रताप याचा सुरेख पुतळा आणि त्याच बरोबर त्यांच्या इतर सहकार्यांचे भव्य पुतळे या बागेत आहेत. एका संग्रहालयात चितोड गढ आणि कुंभाल गढची प्रतिकृती आहे.
५) लेक पॅलेस - पिचोला तलावात बांधलेला हा राजवाडा आज, ताज ग्रुप ने चालवलेले, एक हॉटेल बनला आहे.
६) रज्जू मार्ग - उदयपुर मधली एका टेकडीवर असणर्या करणी माता मंदिराला जाण्यासाठी रज्जू मार्ग बनवला गेला आहे. पर्यटकांना येथून उदयपूरचे विहंगम दृश्य दिसू शकते
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
- विकिव्हॉयेज वरील उदयपूर पर्यटन गाईड (इंग्रजी)
चित्रदीर्घा
[संपादन]-
रज्जुमार्गावरून होणारे उदयपूरचे विहंगम दर्शन
-
पिचोला तलावाच्या काठावरून दिसणारे दृश्य
-
लेक पॅलेस हे आता एक हेरीटेज हॉटेल आहे
-
सिटी पॅलेस कडे नेणारा चढाव
-
फतेहप्रकाश राजवाड्याचा दरवाजा
-
दरवाज्यात असणारे संगमरवरी हत्ती राजघराण्याचे प्रतिक आहेत.
-
पिचोला तलवाच्या काठावर असणारे हे हॉटेल अगदी मोक्याच्या ठिकाणी आहे
-
सिटी पॅलेसमधील हा भाग एका हॉटेल मध्ये रूपांतरीत करण्यात आला आहे.
-
राजवाड्याकडे जाणारा रस्ता मन मोहून टाकतो
-
राजवाड्याच्या बागेतील दिव्याचे सुंदर खांब
-
राजवाड्याच्या दरवाज्यावरील सूर्यकुलाचे प्रतिक असणारा सोन्याचा सूर्य
-
राजवाड्याचा भव्य दरवाजा
-
राजवाड्यातील अनेक महालांची दुरुस्ती चालू आहे
-
राजवाड्याची अनेक मजली भव्य इमारत
-
राजवाड्यासमोरील सुरेख उद्यान
-
राजवाड्याचे प्रवेशद्वार
-
दिंडी दरवाज्यावरील सुरेख नक्षीकाम
-
एकदा दरवाज्यातून आत आलात की छतावरील सुरेख रंगकाम
-
प्रांगणात आल्यावर दिसणारी सुरेख नक्षी
-
आतील बाजूस रंगवलेला दरवान
-
आत शिरताच प्रासादाची माहिती देणारे फलक
-
राजवाड्यात शिरताच दिसणारी गणेश प्रतिमा
-
राजघराण्याची कुलदेवता
-
खिडकीची जाळी नक्षीकामाचा नमुना
-
खिडक्यांच्या जाळीचे नक्षीकाम हा राजस्थानचा आवडता विषय
-
राणा प्रताप यांच्या खोलीकडे नेणारा व्हरांडा
-
दालनाची नक्षीदार महिरप
-
संत मीराबाई याच राजघराण्यातील
-
राजप्रासादातील बाग
-
खिडकीची जाळी
-
बागेतील महालाचे संगमरवरी खांब
-
बागेतील महालाचे काचेचे काम